शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

चुका केलात आता दुरुस्त्याही करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:51 IST

फलटण : ‘शेती पंपाची बिले देताना चुका तुम्ही केल्या, दुरुस्त्याही तुम्हीच करून द्या, त्यासाठी शेतकºयांना हेलपाटे मारायला लावू नका, शेतीपंपाची प्रलंबित मागणी तातडीने पूर्ण करा, ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्यानंतर तेथे तातडीने दुसरा ट्रान्सफार्मर बसवून द्या,’ अशा सूचना सहपालक मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.फलटण तालुक्यातील तडवळे येथे साखरवाडी, हिंगणगाव, सासवड जिल्हा परिषद ...

फलटण : ‘शेती पंपाची बिले देताना चुका तुम्ही केल्या, दुरुस्त्याही तुम्हीच करून द्या, त्यासाठी शेतकºयांना हेलपाटे मारायला लावू नका, शेतीपंपाची प्रलंबित मागणी तातडीने पूर्ण करा, ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्यानंतर तेथे तातडीने दुसरा ट्रान्सफार्मर बसवून द्या,’ अशा सूचना सहपालक मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.फलटण तालुक्यातील तडवळे येथे साखरवाडी, हिंगणगाव, सासवड जिल्हा परिषद गटांतील शासन आपल्या दारी योजनेंतर्गत आयोजित आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कृष्णा खोरे महामंडलाचे माजी उपाध्यक्ष रणजिसिंह नाईक-निंबाळकर, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील, दीपक भोसले, सागर खोत, बाजार समितीचे संचालक अमोल खराडे, सिराज शेख, राजेंद्र काकडे, प्रांताधिकारी संतोष जाधव, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ डोईफोडे, उपअभियंता महादेव पाटील उपस्थित होते.मंत्री खोत म्हणाले, ‘वीजबिल दुरुस्ती किंवा रीडिंग न घेतल्याने एकदम आलेली वीजबिले दुरुस्त करून देण्याचे काम वीजवितरण कंपनीचे अधिकारी त्या गावात जाऊन करतील. संबंधित अधिकाºयांनी गावात जाऊन ग्रामपंचायत कार्यालयात बिले दुरुस्त करून द्यावीत. वीज संंबंधीच्या तक्रारी तेथेच दूर कराव्यात.’तालुक्यात सुमारे सत्तर ट्रान्सफर्मर जळाल्याचे अधिकाºयांनी सांगताच तीव्र संताप व्यक्त करीत मंत्री खोत म्हणाले, ‘नद्या, नाले, विहिरीत सध्या पाणी आहे. शेतात पिके उभी आहेत. चारा पिकांसाठी पाणी आवश्यक असताना एवढे ट्रान्सफार्मर नादुरुस्त होतात. आणि त्याठिकाणी दुसरे ट्रान्सफार्मर बसविताना विजेची थकबाकी भरण्याची तंबी शेतकºयाला दिली जाते हे अवाजवी आहे. कृषी संजीवनी योजनेंतर्गत एकदा हप्ते ठरवून दिल्यानंतर पुन्हा थकबाकीसाठी शेतकºयांची अडवणूक सहन करणार नाही.’महाराष्ट्र शेती महामंडळाकडील खंडकºयांना त्यांच्या मूळ जमिनी पाटपाण्याच्या हक्कासह परत करण्याचा निर्णय झाल्यानंतरही अद्याप अनेक खंडकरी शेतकºयांना जमिनी मिळाल्या नाहीत. काहींना खराब व नापिक जमिनी दिल्या आहेत. त्याचबरोबर एक एकरापेक्षा कमी क्षेत्र मिळणार असलेल्या खंडकºयांना न्याय मिळाला नसल्याबद्दल प्रांताधिकारी यांना सविस्तर अहवाल तयार करून देण्याच्या सूचना खोत यांनी बैठकीतच दिल्या.